आतंकवाद मुर्दाबाद : मुस्लिम युवकांनी काढला कँडल मार्च

यवतमाळ : पहेलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेड येथील मुस्लिम युवकांनी संध्याकाळी हातात कँडल मार्च काढला. उमरखेड शहरातील टिपू सुलतान चौक ते गायत्री चौक पर्यंत मार्च करीत निषेध नोंदविला. यावेळी आतंकवाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आले. या कँडल मार्च चे आयोजन सुन्नी स्टूडेंट फेडरेशन या सामाजिक संघटनेने केलें होते. यावेळी सुन्नी स्टूडेंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सज्जाद खान, शहराध्यक्ष आफताब खान, शाहरूख पठाण, एम आय एम तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन कुरैशी, अहेमद पटेल, शिवसेनेचे मुमताज खान, ताज ग्रुपचे अध्यक्ष शेख साजीद, शेख सत्तार, शेख पप्पू, रेहान रजा, सकलैन खान, हस्सन जागीरदार, दानियाल खान, अजहान, अदीयान उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments