परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रमेश जीवने



यवतमाळ : तीसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी रमेश जीवने यांची निवड करण्यात आली. आंबेडकर चौक पाटीपुरा यवतमाळ येथील रमेश जीवने हे साहित्यिक, विचारवंत, आंबेडकर साहित्य, संविधानाचे गाढे अभ्यासक वक्ते आहे. समाजातील, तळमळ व आंबेडकरी साहित्यिक चळवळीतील अमूल्य योगदानाचे महत्त्व लक्षात घेता १५ मे रोजी अमरावती येथे होणा-या तीसरे परिवर्तनवादी आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आली. आंबेडकरी अभ्यासक डॉ. श्रीकांत पठाडे, ऍड. सनी उके, इंजी. मिलिंद मेश्राम, अविचल मेश्राम, जितेंद्र खोब्रागडे, पराग मेश्राम, अजय तागडे, शशांक लांडोळे, इमप इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments